इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी-एप्रिल १९९० दरम्यान पाच कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. वेस्ट इंडीजने कसोटी मालिका आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका अनुक्रमे २-१ आणि ३-० अशी जिंकली.
बाउर्डा येथील १०-१५ मार्च १९९० रोजी होणारी दुसरी कसोटी पावसामुळे तिसऱ्या दिवशी रद्द करण्यात आली. त्यामुळे नियोजित कसोटी सामन्याच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी म्हणजेच १४ मार्च आणि १५ मार्च १९९० रोजी दोन बदली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळवले गेले. हे बदली सामने एकदिवसीय मालिकेत धरले गेले नाहीत. ह्या दोन बदली सामन्यांपैकी एक सामना पावसामुळे रद्द करावा लागला तर उर्वरीत एक सामना वेस्ट इंडीजने ७ गडी राखून जिंकला.
इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९८९-९०
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.