बांगलादेश क्रिकेट संघाने १६ जून ते १६ जुलै २०२२ दरम्यान दोन कसोटी सामने, तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धे अंतर्गत खेळविण्यात आली. १ जून २०२२ रोजी दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक जारी केले गेले.
२२ मे २०२२ रोजी मोमिनुल हकच्या नेतृत्वाखाली बांगलादेश क्रिकेट बोर्डाने दौऱ्यासाठी पथकाची घोषणा केली. परंतु श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेत पराभवामुळे मोमिनुलने कर्णधारपदावरून राजीनामा दिला. शाकिब अल हसनला नवीन कर्णधार नेमण्यात आले. लिटन दास याला उपकर्णधारपदाची सुत्रे देण्यात आली. कसोटी मालिकेपूर्वी बांगलादेशने तीन-दिवसीय सराव सामना खेळला. वेस्ट इंडीजने दोन्ही कसोटी जिंकत मालिकेत २-० ने विजय मिळवला. या पराभवामुळे बांगलादेश कसोटी विश्वचषकातून बाद ठरला.
ओल्या मैदानामुळे पहिला ट्वेंटी२० सामना सुरू होण्यास दोन तासांचा विलंब झाला. अनेकवेळा पावसाचा व्यत्यय आल्याने सरतेशेवटी फक्त १३ षटकांचा खेळ झाल्यावर उर्वरीत सामना रद्द करण्यात आला. त्याच मैदानावर दोन दिवसांनंतर झालेल्या दुसऱ्या ट्वेंटी२० सामन्यात वेस्ट इंडीजने ३५ धावांनी विजय मिळवला. गयानामध्ये झालेल्या मालिकेतील तिसरा सामना देखील वेस्ट इंडीज ५ गडी राखून जिंकल्याने ट्वेंटी२० मालिका वेस्ट इंडीजने २-० ने जिंकली.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका बांगलादेशने ३-० या फरकाने जिंकली.
बांगलादेश क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२२
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?