श्रीलंका क्रिकेट संघ मार्च-एप्रिल २०२१ दरम्यान दोन कसोटी सामने, तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळविण्यात आली आणि एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळविण्यात आली.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका वेस्ट इंडीजने २-१ अशी जिंकली. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिकेत ३-० असा वेस्ट इंडीजने विजय मिळवला. दोन्ही कसोटी अनिर्णित राहिल्याने कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. २०१५ च्या बांगलादेश-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेनंतर प्रथमच एका मालिकेतील सर्व कसोटी सामने हे अनिर्णित राहिले.
श्रीलंका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२०-२१
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.