वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२०-२१

थोडक्यात पण महत्त्वाचे.

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२०-२१

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने जानेवारी-फेब्रुवारी २०२१ दरम्यान २ कसोटी सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा केला. कसोटी मालिका ही २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळवली गेली तर वनडे मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगअंतर्गत खेळवली गेली.

वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने कसोटी मालिकेसाठी क्रेग ब्रेथवेटकडे कर्णधारपद दिले तर जेसन मोहम्मदला एकदिवसीय संघाच्या नेतृत्वाची जवाबदारी सोपवली गेली. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका बांगलादेशने ३-० अशी जिंकली. वेस्ट इंडीजने पहिल्या कसोटीत विक्रमी ३९५ धावांचा यशस्वी पाठलाग करत पहिली कसोटी ३ गडी राखत जिंकली. चौथ्या डावात आणि पदार्पणातच द्विशतक झळकवणारा काईल मेयर्स हा वेस्ट इंडीजचा दुसरा खेळाडू ठरला. दुसरी कसोटीत १७ धावांनी विजय मिळवत कसोटी मालिका वेस्ट इंडीजने २-० अशी जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →