वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर २०२० दरम्यान दोन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा याच्याअंतर्गत खेळवली गेली. कसोटी सामन्यांआधी वेस्ट इंडीज संघाने तीन सराव सामने खेळले. ऑगस्ट २०२० मध्ये न्यू झीलंड क्रिकेट बोर्डाने दौऱ्याची अधिकृत घोषणा केली.
मार्च २०२० मध्ये भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर कोरोनाव्हायरसमुळे क्रिकेट ठप्प पडले. त्यानंतरची न्यू झीलंडची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका होती. वेस्ट इंडीजने ऑगस्ट-सप्टेंबर २०२० मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिकेत न्यू झीलंडने वेस्ट इंडीजचा २-० असा पराभव केला. मालिकेतील तिसरी ट्वेंटी२० पावसामुळे अवघ्या २.२ षटकांनंतर रद्द केली गेली. दोन्ही कसोट्यांमध्ये वर्चस्व राखत न्यू झीलंडने कसोटी मालिका २-० ने जिंकली. केन विल्यमसन पहिल्या कसोटीत दुखापतग्रस्त झाल्याने दुसऱ्या कसोटीत टॉम लॅथम याने न्यू झीलंडचे नेतृत्व केले.
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२०-२१
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?