न्यू झीलंड क्रिकेट संघाने मार्च-मे १९८५ दरम्यान चार कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. न्यू झीलंडने तब्बल १५ वर्षांनंतर वेस्ट इंडीजचा दौरा केला. या आधी न्यू झीलंड संघ वेस्ट इंडीज मध्ये १९७१-७१ दरम्यान आला होता. न्यू झीलंडने वेस्ट इंडीजमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दिवसीय सामना खेळला. न्यू झीलंड कर्णधार जॉफ हॉवर्थची ही शेवटची क्रिकेट मालिका होती. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका आणि कसोटी मालिका या दोन्ही मालिका वेस्ट इंडीजने अनुक्रमे ५-० आणि २-० अश्या जिंकल्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →न्यू झीलंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९८४-८५
थोडक्यात पण महत्त्वाचे.