१९८६ ऑस्ट्रेलेशिया चषक

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

१९८६ ऑस्ट्रेलेशिया चषक ही संयुक्त अरब अमिरातीस्थित क्रिकेट प्रशंसक अब्दुल रहमान बख्तीतार यांच्या मदतीने १० ते १८ एप्रिल १९८६ या कालावधीमध्ये संयुक्त अरब अमिरातीत झालेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा होती. ऑस्ट्रेलेशिया चषक मालिकेतील ही प्रथम आवृत्ती होती. ही स्पर्धा आशिया आणि ऑस्ट्रेलेशिया या खंडातील क्रिकेट खेळाणाऱ्या प्रमुख देशांसाठी भरवली गेली होती. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड या पाच देशांच्या राष्ट्रीय क्रिकेट संघांनी भाग घेतला. सर्व सामने संयुक्त अरब अमिरातीच्या शारजाह शहरातील शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळविण्यात आले.

स्पर्धा बाद-फेरी पद्धतीने खेळविण्यात आली. १९८६ आशिया चषक जिंकल्याने श्रीलंका थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला. न्यू झीलंडने प्राथमिक फेरीचा सामना गमावला. भारताने न्यू झीलंडचा ३ गडी राखून पराभव केला. तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात पाकिस्तानने ८ गडी राखत सामना जिंकला. प्राथमिक फेरीच्या सामन्यात हरलेल्या संघांमध्ये अर्थात न्यू झीलंडने ऑस्ट्रेलियापेक्षा विरुद्ध संघाचे जास्ती गडी बाद केल्याने न्यू झीलंड उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला.

अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताला पराभूत करत उद्घाटनाचा ऑस्ट्रेलेशिया चषक जिंकला. विजेत्या पाकिस्तान संघाला ४० हजार अमेरिकन डॉलरचे बक्षिस देण्यात आले. भारताच्या सुनील गावसकर यांना मालिकावीराचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →