१९८६ आशिया चषक

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

१९८६ आशिया चषक ही आशिया क्रिकेट संघटन ने आयोजित केलेली एकदिवसीय स्पर्धा होती. आशिया चषक मालिकेतील ही २री स्पर्धा श्रीलंकेत मार्च-एप्रिल १९८६ मध्ये झाली. या स्पर्धेत श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांनी सहभाग घेतला. श्रीलंकेसोबत चालु असलेल्या राजकीय तणावामुळे भारताने स्पर्धेतून माघार घेतली. १९८४ दक्षिण-पुर्व आशिया चषक जिंकल्याने बांगलादेश या स्पर्धेसाठी पात्र ठरला आणि आशिया चषकात पदार्पण केले.

स्पर्धा साखळी पद्धतीने खेळविण्यात आली. प्रत्येक संघ विरुद्ध संघाशी एक सामना खेळला. अंतिम समयी अव्वल दोन संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. अंतिम सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव करत पहिलावहिला आशिया चषक जिंकला. श्रीलंकेच्या अर्जुन रणतुंगाला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →