१९८८ आशिया चषक

थोडक्यात पण महत्त्वाचे.

१९८८ आशिया चषक ही आशिया क्रिकेट संघटन ने आयोजित केलेली एकदिवसीय स्पर्धा होती. आशिया चषक मालिकेतील ही ३री स्पर्धा बांगलादेशमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर १९८८ मध्ये झाली. या स्पर्धेत श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश आणि भारत या देशांनी सहभाग घेतला. बांगलादेशात प्रथमच लिस्ट-अ सामने स्वरूपाची स्पर्धा खेळवली जात होती. तेव्हा बांगलादेश आयसीसीचा पूर्ण सदस्य नव्हता. सर्व सामने ढाक्यातील बंगबंधू नॅशनल स्टेडियमवर खेळविण्यात आले.

स्पर्धा साखळी पद्धतीने खेळविण्यात आली. प्रत्येक संघ विरुद्ध संघाशी एक सामना खेळला. अंतिम समयी अव्वल दोन संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा ६ गडी राखून पराभव करत दुसऱ्यांदा आशिया चषक जिंकला. भारताच्या नवज्योतसिंग सिद्धूला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →