२००४ आशिया चषक

थोडक्यात पण महत्त्वाचे.

२००० आशिया चषक ही आशिया क्रिकेट संघटन ने आयोजित केलेली एकदिवसीय स्पर्धा होती. आशिया चषक मालिकेतील ही ८वी स्पर्धा श्रीलंकामध्ये जुलै-ऑगस्ट २००४ मध्ये झाली. या स्पर्धेत श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, भारत, संयुक्त अरब अमिराती आणि हाँग काँग या देशांनी सहभाग घेतला. या स्पर्धेला इंडियन ऑईल आशिया चषक असेही संबोधले गेले. संयुक्त अरब अमिराती आणि हाँग काँग या देशांनी या स्पर्धेत प्रथमच पदार्पण केले.

या वेळेस स्पर्धा वेगळ्या पद्धतीने खेळविण्यात आली. ३ संघांचे दोन गट केले गेले. गट फेरीच्या शेवटी प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर चार प्रकारात पात्र ठरले. सुपर चारच्या शेवटी अव्वल दोन संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारताचा २५ धावांनी पराभव करत तिसऱ्यांदा आशिया चषक जिंकला. श्रीलंकेच्या सनथ जयसुर्याला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →