१९९५ आशिया चषक ही आशिया क्रिकेट संघटन ने आयोजित केलेली एकदिवसीय स्पर्धा होती. आशिया चषक मालिकेतील ही ५वी स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये एप्रिल १९९५ मध्ये झाली. या स्पर्धेत श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश आणि भारत या देशांनी सहभाग घेतला. सर्व सामने शारजाहतील शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळविण्यात आले. संयुक्त अरब अमिरातीमध्ये दुसऱ्यांदा आशिया चषकाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला पेप्सी आशिया चषक असेही संबोधले गेले.
स्पर्धा साखळी पद्धतीने खेळविण्यात आली. प्रत्येक संघ विरुद्ध संघाशी एक सामना खेळला. अंतिम समयी अव्वल दोन संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. साखळी फेरी संपल्यानंतर भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान हे तीनही संघ गुणफलकात ८ गुणांसह बरोबरीत होते पण निव्वळ धावगतीच्या जोरावर भारत आणि श्रीलंका अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा ८ गडी राखून पराभव करत सलग तिसऱ्यांदा (एकूण चौथ्यांदा) आशिया चषक जिंकला. भारताच्या नवज्योतसिंग सिद्धूला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
१९९५ आशिया चषक
यामागील विज्ञान आणि इतिहास.