१९९७ आशिया चषक ही आशिया क्रिकेट संघटन ने आयोजित केलेली एकदिवसीय स्पर्धा होती. आशिया चषक मालिकेतील ही ६वी स्पर्धा श्रीलंकेमध्ये जुलै १९९७ मध्ये झाली. या स्पर्धेत श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश आणि भारत या देशांनी सहभाग घेतला. श्रीलंकेमध्ये दुसऱ्यांदा आशिया चषकाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला पेप्सी आशिया चषक असेही संबोधले गेले.
स्पर्धा साखळी पद्धतीने खेळविण्यात आली. प्रत्येक संघ विरुद्ध संघाशी एक सामना खेळला. अंतिम समयी अव्वल दोन संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारताचा ८ गडी राखून पराभव करत दुसऱ्यांदा आशिया चषक जिंकत भारताचा सलग तीन चषक जिंकण्याचा विजयरथ खंडित केले. श्रीलंकेच्या अर्जुन रणतुंगाला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
१९९७ आशिया चषक
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.