१९९०-९१ आशिया चषक ही आशिया क्रिकेट संघटन ने आयोजित केलेली एकदिवसीय स्पर्धा होती. आशिया चषक मालिकेतील ही चौथी स्पर्धा भारतामध्ये २५ डिसेंबर १९९० ते ४ जानेवारी १९९१ दरम्यान झाली. स्पर्धेत भारत, श्रीलंका आणि बांगलादेश हे तीन संघ सहभागी झाले होते. भारतासोबत ताणल्या गेलेल्या राजकीय संबंधांमुळे पाकिस्तानने स्पर्धेतून अंग काढून घेतले होते.
सदर स्पर्धा साखळी पद्धतीने खेळवली गेली, ज्यामध्ये प्रत्येक संघ इतर संघांबरोबर प्रत्येकी एकदा खेळा आणि दोन सर्वोत्तम संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. भारत आणि श्रीलंकेदरम्यान झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा ७ गडी राखून पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा (एकूण तिसऱ्यांदा) आशिया चषकावर आपले नाव कोरले.
१९९०-९१ आशिया चषक
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?