१९९४ ऑस्ट्रेलेशिया चषक

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

१९९४ ऑस्ट्रेलेशिया चषक (किंवा १९९४ पेप्सी ऑस्ट्रेलेशिया चषक) ही १२ ते २२ एप्रिल १९९४ या कालावधीमध्ये संयुक्त अरब अमिरातीत झालेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा होती. ऑस्ट्रेलेशिया चषक मालिकेतील ही तृतीय व अखेरची आवृत्ती होती. ही स्पर्धा आशिया आणि ऑस्ट्रेलेशिया या खंडातील क्रिकेट खेळाणाऱ्या प्रमुख देशांसाठी भरवली गेली होती. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड या सहा देशांच्या राष्ट्रीय क्रिकेट संघांनी सदर स्पर्धेत भाग घेतला. सर्व सामने शारजाह मधील शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळविण्यात आले. १९९४ आय.सी.सी. चषकद्वारे १९९६ क्रिकेट विश्वचषकसाठी पात्र ठरल्यामुळे संयुक्त अरब अमिरातीने या स्पर्धेत सहभाग घेतला. संयुक्त अरब अमिरातीने त्यांचे पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले.

सहभागी देशांना तीन संघांच्या दोन गटात विभागले. दोन्ही गटामधून अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताला हरवत सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलेशिया चषक जिंकला. पाकिस्तानच्या आमिर सोहेलला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक २७४ धावा करत आघाडी फलंदाज ठरला. तर सर्वाधिक १० गडी मिळवत भारताचा जवागल श्रीनाथ आघाडीचा गोलंदाज ठरला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →