१९८६ फिफा विश्वचषक

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

१९८६ फिफा विश्वचषक

१९८६ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची तेरावी आवृत्ती स्पेन देशामध्ये ३१ मे ते २९ जून १९८६ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील १०९ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी २४ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

आर्जेन्टिनाने अंतिम फेरीच्या सामन्यात पश्चिम जर्मनीला ३–१ असे पराभूत करून आपले दुसरे अजिंक्यपद मिळवले. ह्या स्पर्धेच्या उपांत्य पूर्व फेरीमधील आर्जेन्टिना विरुद्ध इंग्लंड ह्या सामन्यातील दिएगो मारादोनाने मारलेले दोन गोल स्मरणीय ठरले. पहिला गोल मारादोनाने हाताने चेंडू ढकलून केला ज्याला हँड ऑफ गॉड असे संबोधले जाते तर दुसरा गोल त्याने एकट्याने चार इंग्लिश बचावपटूंना चकवून केला ज्याला गोल ऑफ द सेंच्युरी (शतकामधील सर्वोत्तम गोल) असे ओळखले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →