१९६६ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची आठवी आवृत्ती युनायटेड किंग्डमच्या इंग्लंड देशामध्ये ११ जुलै ते ३० जुलै १९६६ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ५७ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
यजमान इंग्लंडने अंतिम फेरीच्या सामन्यात पश्चिम जर्मनीला ४–२ असे पराभूत करून आपले पहिले अजिंक्यपद मिळवले. यजमान देशाने विश्वचषक जिंकण्याची ही केवळ दुसरीच वेळ होती (१९३४ इटली नंतर).
१९६६ फिफा विश्वचषक
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.