१९९० फिफा विश्वचषक

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

१९९० फिफा विश्वचषक

१९९० फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची चौदावी आवृत्ती इटली देशामध्ये ८ जून ते ८ जुलै १९९० दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ११६ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी २४ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

अंतिम फेरीच्या सामन्यात पश्चिम जर्मनीने आर्जेन्टिनाला १–० असे पराभूत करून आपले तिसरे अजिंक्यपद मिळवले. ही विश्वचषक स्पर्धा आजवरची सर्वात निकृष्ट दर्जाची समजली जाते. बऱ्याचशा संघांनी बचावात्मक डावपेच वापरण्यावर भर दिला ज्यामुळे प्रति सामना गोलांची संख्या कमी झाली व सामने निरस झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →