स्टॅनफोर्ड २०/२०

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

स्टॅनफोर्ड २०/२० ही वेस्ट इंडीजमधील अँटिगा बेटावर खेळवली जाणारी एक अल्पायुषी क्रिकेट स्पर्धा होती. या स्पर्धेची पहिली आवृत्ती जुलै आणि ऑगस्ट २००६ मध्ये वेस्ट इंडीजमधील स्टॅनफोर्ड क्रिकेट मैदान, सेंट जॉन्स येथे खेळली गेली. त्यानंतर २००८ मध्ये पुन्हा त्याच ठिकाणी ही स्पर्धा भरवण्यात आली.

या स्पर्धेची संकल्पना आणि आर्थिक पुरवठा अँटिगन-अमेरिकन उद्योगपती ॲलन स्टॅनफोर्ड यांचा होता. असे आरोप केले जातात की, स्टॅनफोर्डने या स्पर्धेची निर्मिती त्याच्या फसव्या व्यवसाय योजनांमधून मिळवलेला पैसा वैध (मनी लाँडरिंग) करण्यासाठी केली होती. यासाठी तो सध्या अमेरिकेत मध्ये दीर्घकाळ तुरुंगवास भोगत आहे.

या स्पर्धेच्या पहिल्या हंगामात १९ संघांनी भाग घेतला होता, तर दुसऱ्या हंगामात २० संघ सहभागी झाले होते. २००८चा हंगाम वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डच्या अधिकृत कॅलेंडरचा भाग होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →