क्रिकेट विश्वचषक, १९९२

यामागील विज्ञान आणि इतिहास.

क्रिकेट विश्वचषक, १९९२

१९९२ क्रिकेट विश्वचषक (अधिकृत नाव १९९२ बेन्सन आणि हेजेस विश्वचषक) आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन (आयसीसी) आयोजित क्रिकेट विश्वचषकाचे हे पाचवे आयोजन होते. ही स्पर्धा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड या दोन देशात २२ फेब्रुवारी ते २५ मार्च १९९२ दरम्यान खेळवली गेली. पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात प्रथमच विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड या देशांमध्ये विश्वचषक स्पर्धा प्रथमच भरविण्यात आली. ही स्पर्धा बेन्सन आणि हेजेस ने प्रायोजित केली व ह्या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यू झीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडीज, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका व झिम्बाब्वे या ९ संघांनी सहभाग घेतला. या आधीची स्पर्धा भारत आणि पाकिस्तान मध्ये पाच वर्षांपूर्वी १९८७ साली झाली. मागील विजेते ऑस्ट्रेलिया संघ होता.

१९९२ च्या विश्वचषकात सर्वप्रथम खेळाडूंनी रंगीत कपडे घातले, सामने श्वेतवर्णाच्या क्रिकेट चेंडूनी खेळविण्यात आले आणि ब्लॅक साईडस्क्रिन होते ज्यात प्रकाशझोतात अनेक सामने खेळले गेले. १९९२ च्या जानेवारीत दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने बहिष्कार उठवत पुन्हा कसोटी दर्जा देत सदस्य केले होते. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा हा पहिला वहिला विश्वचषक होता.

इंग्लंड, न्यू झीलंड, दक्षिण आफ्रिका व पाकिस्तान संघ उपांत्य फेरीसाठी पात्र झाले. २५ मार्च १९९२ रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडला २२ धावांनी हरवत विश्वचषक पहिल्यांदाच जिंकला. न्यू झीलंडच्या मार्टिन क्रोव ने स्पर्धेत सर्वाधिक ४५६ धावा केल्या तर पाकिस्तानच्या वसिम अक्रम सर्वाधिक बळी (१८) घेणारा खेळाडू ठरला. विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने झिम्बाब्वेला संपूर्ण सदस्य नियुक्त करत कसोटी दर्जा बहाल केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →