क्रिकेट विश्वचषक, १९८७

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

१९८७ क्रिकेट विश्वचषक (अधिकृत नाव १९८७ रिलायन्स विश्वचषक) आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन (आयसीसी) आयोजित क्रिकेट विश्वचषकाचे हे चौथे आयोजन होते. ही स्पर्धा भारत आणि पाकिस्तानमध्ये ८ ऑक्टोबर - ८ नोव्हेंबर १९८७ च्या दरम्यान खेळवली गेली. प्रथमच इंग्लंडबाहेर विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय उपखंडातील भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये विश्वचषक स्पर्धा प्रथमच भरविण्यात आली. ही स्पर्धा रिलायन्स ने प्रायोजित केली व ह्या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यू झीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडीज, श्रीलंका व झिम्बाब्वे या ८ संघांनी सहभाग घेतला. गट फेरीचे सामने ४ संघांच्या २ गटात खेळवले गेले. गट फेरीतील प्रमुख दोन संघ उपांत्य फेरीत गेले. या आधीची स्पर्धा इंग्लंडमध्ये चार वर्षांपूर्वी १९८३ साली झाली. मागील विजेते भारत संघ होता.

सर्व सामने ५० षटकांचे होते व सर्व सामने दिवसा खेळवण्यात आले.

इंग्लंड, पाकिस्तान, भारत व ऑस्ट्रेलिया संघ उपांत्य फेरीसाठी पात्र झाले. ८ नोव्हेंबर १९८७ रोजी इडन गार्डन्सवर झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ७ धावांनी हरवत विश्वचषक पहिल्यांदाच जिंकला. इंग्लंडच्या ग्रॅहाम गूच ने स्पर्धेत सर्वाधिक ४७१ धावा केल्या तर ऑस्ट्रेलियाचा क्रेग मॅकडरमॉट सर्वाधिक बळी (१८) घेणारा खेळाडू ठरला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →