क्रिकेट विश्वचषक, १९७९

या विषयातील रहस्ये उलगडा.

क्रिकेट विश्वचषक, १९७९

१९७९ क्रिकेट विश्वचषक (अधिकृत नाव प्रुडंशियल चषक) आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन (आयसीसी) आयोजित क्रिकेट विश्वचषकाचे दुसरे आयोजन होते. ही स्पर्धा इंग्लंडमध्ये ९ जून ते २३ जून १९७९ च्या दरम्यान खेळवली गेली. ही स्पर्धा प्रुडंशियल ऍश्युरन्स कंपनी ने प्रायोजित केली व ह्या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यू झीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडीज तसेच श्रीलंका व कॅनडा या ८ संघांनी सहभाग घेतला. साखळी सामने ४ संघांच्या २ गटात खेळवले गेले. गट फेरीतील प्रमुख दोन संघ बाद फेरीत गेले.

प्रुडेंशियल चषक वेस्ट इंडीज ने अंतिम सामन्यात इंग्लंडला हारवून जिंकला.

वेस्ट इंडीजच्या गॉर्डन ग्रीनिज याने सर्वाधिक धावा केल्या तर इंग्लंडच्या माइक हेंड्रिक्स याने सर्वाधिक गडी बाद केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →