स्क्वेअर किलोमीटर ॲरे

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

स्क्वेअर किलोमीटर ॲरे

स्क्वेअर किलोमीटर ॲरे (Square Kilometre Array; SKA; एसकेए किंवा स्का) हा ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये बनवण्यात येणारा अनेक रेडिओ दुर्बिणींचा एक भव्य प्रकल्प आहे जर पूर्ण झाला तर त्याचे संकलन क्षेत्रफळ एक वर्ग किलोमीटर असेल. हा प्रकल्प रेडिओ वर्णपटातील विस्तृत वारंवारतांवर काम करेल आणि त्याच्या आकारामुळे तो इतर कोणत्याही रेडिओ दुर्बिणीपेक्षा ५० पट जास्त संवेदनशील असेल. यासाठी अतिशय उच्च क्षमतेचे केंद्रीय संगणक आणि सध्याच्या जागतिक इंटरनेट वाहतुकीपेक्षा जास्त क्षमतेचे लांब पल्ल्याचे दुवे लागतील. त्यामुळे कधीही नव्हे इतक्या दहा हजार पटापेक्षा जास्त वेगाने आकाशाचे सर्वेक्षण करता येईल.

या टेलिस्कोपची ग्रहण केंद्रे केंद्रीय कोरपासून कमीत कमी ३००० किमी (१९०० मैल) अंतरावर असल्यामुळे त्यांपासून खगोलांची सर्वात जास्त विभेदन असलेली छायाचित्रे मिळतील. एसकेए दक्षिण गोलार्धातील उप-सहारा राज्यांमध्ये बनवले जाईल व त्याचे केंद्रीय कोर रेडिओ गोंगाट कमी असलेल्या आणि आपल्या आकाशगंगेचे सर्वोत्तम दृश्य दिसणाऱ्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये असेल.

एसकेएच्या नियोजित योजनेनुसार त्याचे बांधकाम २०१८ मध्ये सुरू करण्यात येणार आहे आणि सुरुवातीची निरीक्षणे २०२० साली घेण्यातयेतील. एसकेएचे बांधकाम दोन टप्प्यांमध्ये पूर्ण केले जाईल. पहिला टप्पा (२०१८-२०२३) दुर्बिणीच्या एकूण क्षमतेच्या १०% असेल. एसकेएच्या पहिल्या टप्प्याचा खर्च ६५ कोटी युरो आहे. दुसऱ्या टप्प्याचा खर्च अद्याप काढण्यात आलेला नाही. या प्रकल्पाचे मुख्यालय युनायटेड किंग्डमच्या जॉड्रेल बँक वेधशाळा येथे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →