इंडिगो तथा इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड ही भारत देशामधील एक कमी दराने विमानसेवा पुरवणारी एक विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोचे मुख्यालय गुरगांव येथे असून मे २०१४ रोजी भारतामधील एकूण हवाई प्रवासी वाहतूकीचा ३२.३% इतका वाटा इंडिगोचा होता. ही कंपनी कमी दरात सेवा देणाऱ्या जगातील कंपन्यांमध्ये सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्यांपैकी एक आहे. रोज ५३४ उड्डाणांद्वारे ३६ विमानताळांवर या कंपनीची ए३२० प्रकारची ८४ विमाने ये-जा करतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इंडिगो
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.