एर अरेबिया (अरबी: العربية للطيران) ही संयुक्त अरब अमिरातीमधील स्वस्त दरात विमान प्रवास देणारी विमान वाहतूक कंपनी असून त्याचे मुख्यालय शारजा आंतरराष्ट्रीय विमानतळामधील शारजा व्यापारी केंद्र येथे आहे. शारजापासून मध्य पूर्व, उत्तर आफ्रिका, भारतीय उपखंड, मध्य आशिया आणि युरोप अशा २२ शहरांमधील ८९ विमानतळांवर कंपनीची विमाने उड्डाण करतात. कॅसाब्लान्स, फेझ, नादोर, टॅन्जिअर आणि मरकेश अशा ९ शहरांमधून २८ स्थानकांवर आणि अलेक्झांड्रिआ मधून ४ शहरांमधील ६ स्थानकांवर उड्डाण करतात.
मुख्य विश्रांतीस्थळ शारजा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शारजामधून इतर ठिकाणी विमानाने जाण्यासाठी स्वस्त दरात सुविधा देणारी ही एकमेव कंपनी आहे. अलेक्झांड्रिया आणि कासाब्लांका या शहरांवर मुख्य भर दिला गेलेला आहे. एर अरेबिआ ही अरब हवाई वाहतूक संघटनेची सभासद आहे.
एर अरेबिया
या विषयातील रहस्ये उलगडा.