एआयएक्स कनेक्ट

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

एआयएक्स कनेक्ट

एर एशिया इंडिया प्रा.लि. ही भारतामधील एक कमी दरात विमानसेवा पुरवणारी कंपनी आहे. एरएशिया, टाटा समूह आणि टेलेस्ट्रा ट्रेडप्लस या तीन कंपन्यांच्या माध्यामातून संयुक्त उदयम म्हणून एर एशिया इंडिया ही कंपनी 19 फेब्रुवारी 2013 रोजी स्थापन करण्यात आली. एकूण गुंतवणूकीमध्ये एर एशियाचा 49 %, टाटा समूहाचा 30%, आणि टेलेस्ट्रा ट्रेडप्लसचा 21% वाटा आहे. या कंपनीद्वारे साठ वर्षानंतर टाटांनी विमान वाहतूक सेवेमध्ये नव्याने प्रवेश केलेला आहे.

भारतामध्ये 1.25/प्रति किलोमीटर इतक्या स्वस्त दराने विमानसेवा पुरविणारी ही पहिली सहाय्यकारी परकीय कंपनी आहे. यासाठी आवश्यक असणा-या इंधनाचा साठा या कंपनीकडे आहे आणि प्रत्येक अर्ध्या तासानंतर सेवा देण्याचा त्यांचा मानस आहे. एर एशियाकडे सध्या एरबस ए३२० बनावटीची तीन विमाने आणि 200हून अधिक कर्मचारीवर्ग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →