श्रीलंकन एरलाइन्स (सिंहला:ශ්රී ලන්කන් ගුවන් සේවය, तमिळ: சிறீலங்கன் எயர்லைன்ஸ்; जुने नाव: एर लंका) ही श्री लंका देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. ही कंपनी सध्या आशिया व युरोपातील ३५ देशांमधील ६१ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवते. १९४७ साली स्थापन झालेली एर सिलोन ही विमान कंपनी १९७८ साली बंद पडली व त्याऐवजी एर लंका ही कंपनी १९७९ मध्ये सुरू करण्यात आली. १९९८ मध्ये एर लंकाचे नाव बदलून श्रीलंकन असे ठेवण्यात आले.
श्रीलंकेची प्रवासी वाहतूक करणारी ही विमान कंपनी असून कोलंबो येथील बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आणि हंबाटोटा येथील माटाला राजपक्ष आंतरराष्ट्रीय विमानतळावरून युरोप , मध्य पूर्व , दक्षिण आशिया , दक्षिणपूर्व आशिया , पूर्व , उत्तर अमेरीका , ऑस्ट्रेलिआ आणि आफ्रिका इत्यादी अशा ३५ शहरांना ६५ स्थानकांद्वारे जोडलेले आहे.
श्रीलंकन एरलाइन्स
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.