डेल्टा एर लाइन्स (Delta Air Lines) ही अमेरिकेतील एक आघाडीची विमान वाहतूक कंपनी आहे. ही कंपनी जगभर विमानसेवा पुरवते. डेल्टा एर लाइन्सचे मुख्यालय जॉर्जिया मधील अटलांटा येथे आहे. स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून या कंपनीची सहा खंडामधून मोठया प्रमाणावर विमानवाहतूक सेवा कार्यान्वित आहे. ८०,००० पेक्षा जास्त कामगार वर्ग आणि दैनंदिन ५००० उड्डाणे करत असलेली ही सर्वांत मोठी विमानप्रवासी कंपनी आहे. या कंपनीच्या विमानांचे विश्रांतिस्थळ हर्टजफिल्ड येथील जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे असून जगामधील प्रवासी वाहतुकीसाठी सर्वांत व्यस्त ( वार्षिक ९१ अब्ज पेक्षा जास्त प्रवासी ) व या कंपनीच्या विमानांचे तांत्रिक दुरूस्ती केंद्र म्हणून ओळखले जाते. ही विमानकंपनी सर्वांत जुनी विमानकंपनी असून स्थापना केल्यापासून ६ व्या क्रमांकावर आहे. २०११ मध्ये विमांनाच्या ताफ्याच्या व २०१२ मध्ये प्रवाशांच्या तुलनेत जगामधील सर्वांत मोठी कंपनी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →डेल्टा एर लाइन्स
या विषयावर तज्ञ बना.