राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र

यामागील विज्ञान आणि इतिहास.

राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र

राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र (इंग्रजी: National Centre for Radio Astrophysics (NCRA) - नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्‍स (एनसीआरए)) पुणे विद्यापीठाच्या आवारातील आयुकाच्या शेजारील रेडिओ खगोलभौतिकीच्या क्षेत्रातील एक अग्रगण्य संशोधन संस्था आहे. ही संस्था टाटा मुलभूत संशोधन संस्थेचा (टिआयएफआर) एक भाग आहे. एनसीआरए मध्ये खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी यामधील अनेक विषयांवर संशोधन होते ज्यामध्ये सक्रिय दीर्घिका, आंतरतारकीय माध्यम, पल्सार, विश्वनिर्मितीशास्त्र आणि विषेशत: रेडिओ खगोलशास्त्र आणि रेडिओ उपकरणशास्त्र यांचा समावेश आहे. एनसीआरए ने जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) या पुण्यापासून ८० किमी अंतरावरील खोडद येथे मीटर तरंगलांबीतील जगातील सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बिणीची निर्मिती केली असून ती दुर्बीण ही संस्था चालवते. त्याचबरोबर एनसीआरए ऊटी रेडिओ टेलिस्कोप ही वृत्तचित्तीच्या आकाराची तामिळनाडू राज्यातील उदगमंडलम येथील रेडिओ दुर्बीण सुद्धा चालवते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →