फर्मी गॅमा किरण अंतराळ दुर्बीण

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

फर्मी गॅमा किरण अंतराळ दुर्बीण

फर्मी गॅमा किरण अंतराळ दुर्बीण ही गॅमा किरणांमध्ये खगोलीय स्रोतांचा वेध घेणारी अंतराळ वेधशाळा आहे. फर्मीला ११ जून २००८ रोजी नासाच्या डेल्टा २ या रॉकेटमधून अंतराळात प्रक्षेपित करण्यात आले. नासा, यू.एस. ऊर्जा विभाग त्याचबरोबर फ्रान्स, जर्मनी, जपान, इटली आणि स्वीडन या देशातील सरकारी संस्थांच्या सहयोगाने या वेधशाळेची निर्मिती करण्यात आली.

यातील लार्ज एरिया टेलिस्कोप हे मुख्य उपकरण आहे. खगोलशास्त्रज्ञ याचा वापर मुख्यत: संपूर्ण आकाशाचा गॅमा किरणांमध्ये सर्व्हे करून सक्रिय दीर्घिकीय केंद्रक, पल्सार व इतर उच्च ऊर्जेचे स्रोत आणि कृष्णद्रव्य यांच्या अभ्यासासाठी करतात. यातील गॅमा-रे बर्स्ट मॉनिटर या दुसऱ्या उपकरणाचा गॅमा किरण स्फोटांचा अभ्यास करण्यासाठी वापर केला जातो.

फर्मीपासून मिळणारा डेटा सर्वांसाठी खुला असून तो फर्मी सायन्स सपोर्ट सेलच्या संकेतस्थळावरून मिळवता येऊ शकतो. डेटाचे विश्लेषण करण्यासाठी लागणारे सॉफ्टवेअरसुद्धा सर्वांसाठी उपलब्ध आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →