२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल - पुरुष

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष फुटबॉल स्पर्धा ४-२० ऑगस्ट दरम्यान खेळवली जाईल. उन्हाळी ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धेची ही २६वी आवृत्ती आहे. महिला स्पर्धेसोबत, २०१६ उन्हाळी ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धा ही ब्राझीलमधील सहा शहरांमध्ये पार पडेल. यजमान शहर रियो दि जानेरो मधील माराकान्या मैदानावर अंतिम सामना होईल. पुरुष गटामध्ये सहभागी होणाऱ्या संघामध्ये २३ वर्षांखालील खेळाडूंनाच (१ जानेवारी १९९३ किंवा त्यानंतर जन्मलेल्या) खेळण्याची परवानगी आहे. प्रत्येक संघात फक्त तीनच २३ वर्षांवरील खेळाडूंना सहभागी होता येईल.

ह्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच हॉक-आय पद्धतीने गोल-लाईन तंत्रज्ञान वापरले जाईल. अतिरिक्त वेळेत चौथा बदली खेळाडू वापरता येण्याची चाचणी म्हणून सदर स्पर्धेला आंतरराष्ट्रीय फुटबॉल असोसिएशन मंडळचा भाग म्हणून मार्च २०१६ मध्ये मान्यता देण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →