२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन

रियो दी जानेरो, ब्राझीलमधील रियोसेंट्रोच्या चवथ्या पॅव्हेलियनमध्ये ११ ते २० ऑगस्ट दरम्यान २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन स्पर्धा खेळवली गेली. एकून पाच क्रीडाप्रकारांमध्ये १७२ खेळाडू सहभागी झाले: पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी, महिला दुहेरी, आणि मिश्र दुहेरी.

२०१२ प्रमाणेच ह्यावेळी सुद्धा स्पर्धेचे स्वरूप गट फेरी आणि बाद फेरी असेच ठेवले गेले होते. दुहेरीच्या स्पर्धांमध्ये, बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने आधीच्या ऑलिंपिकमध्ये झालेल्या मॅच फिक्सींगच्या प्रकरणांमुळे स्पर्धेच्या नियमांमध्ये अनेक बदल घडवून आणले होते. गटात दुसऱ्या क्रमांकावरील जोड्यांना पुढील फेरीमध्ये कोणत्या जोडीविरुद्ध खेळावे लागेल हे ठरविण्यासाठी पुन्हा एकदा ड्रॉ काढला गेला, तर गटातील अव्वल जोडीला बाद फेरीमध्ये त्यांना दिलेल्या क्रमवारी(सिडींग)नुसार स्थान देण्यात आले.

खेळांमध्ये अंदाजे ८,४०० शटलकॉक वापरण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →