२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल स्पर्धा ब्राझीलमध्ये ३ ते २० ऑगस्ट दरम्यान खेळवली जाईल.

ऑलिंपिक यजमान शहर रियो दि जानेरोशिवाय सामने बेलो होरिझोन्ते, ब्राझिलिया, साल्व्हादोर, साओ पाउलो मानौस या शहरांमध्ये खेळवण्यात येतील. ह्या सर्वच्या सर्व सहा शहरांमध्ये २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेचे सामने झाले होते, फक्त रियो मधील एस्तादियो ऑलिंपिको हे ऑलिंपिक मैदान विश्वचषकाचे मैदान नव्हते.

फिफाशी संलग्न संघटना या स्पर्धेत संघ पाठवू शकतात. पुरुष गटात २३ वर्षांपेक्षा कमी वयाच्या (१ जानेवारी १९९३ रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेले) खेळाडूंसह, त्यापेक्षा मोठ्या फक्त तीन खेळाडूंना एका संघात खेळण्यास परवानगी आहे. महिला गटासाठी वयाची कोणतीही अट नाही. स्पर्धेमध्ये ४०० फुटबॉल वापरले जातील.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →