२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल - महिला

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला फुटबॉल स्पर्धा ३-१९ ऑगस्ट दरम्यान खेळवली जाईल. महिला ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धेची ही ६वी आवृत्ती आहे. पुरुष स्पर्धेसोबत, २०१६ उन्हाळी ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धा ही ब्राझीलमधील सहा शहरांमध्ये पार पडेल. यजमान शहर रियो दि जानेरो मधील माराकान्या मैदानावर अंतिम सामना होईल. महिला स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांच्या खेळाडूंना वयाचे कोणतेही बंधन नाही

ह्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच हॉक-आय पद्धतीने गोल-लाईन तंत्रज्ञान वापरले जाईल. अतिरिक्त वेळेत चौथा बदली खेळाडू वापरता येण्याची चाचणी म्हणून सदर स्पर्धेला आंतरराष्ट्रीय फुटबॉल असोसिएशन मंडळचा भाग म्हणून मार्च २०१६ मध्ये मान्यता देण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →