इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स (इंग्रजी: Inter-University Center for Astronomy and Astrophysics (IUCAA)) ही पुणे विद्यापीठाच्या आवारात असलेली एक संशोधन संस्था आहे. ती आयुका या संक्षिप्त नावाने प्रसिद्ध आहे. या संस्थेमध्ये प्रामुख्याने खगोलशास्त्र, खगोलभौतिकी आणि सैद्धांतिक भौतिकी या विषयांवर संशोधन केले जाते. प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ जयंत नारळीकर हे या संस्थेचे पहिले संचालक होते. आयुकाच्या कॅम्पसची रचना प्रसिद्ध भारतीय वास्तुशास्त्रज्ञ चार्ल्स कोर्रिआ यांनी केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स
या विषयातील रहस्ये उलगडा.