सॅम बहादुर (SAMबहादुर म्हणून शैलीबद्ध) हा २०२३ मधील हिंदी चित्रपट आहे. हा एक चरित्रपट असून, भारताचे पहिले फील्ड मार्शल, सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचे मेघना गुलजार यांनी दिग्दर्शन केले असून, याच सोबत त्यांनी याचे सहलेखन भवानी अय्यर आणि शंतनू श्रीवास्तव यांच्यासोबत केले आहे. आरएसव्हीपी मुव्हीज च्या बॅनरखाली रॉनी स्क्रूवाला हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. यात फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, नीरज काबी, एडवर्ड सोनेनब्लिक आणि मोहम्मद झीशान अय्युब यांच्यासोबत विक्की कौशल माणेकशॉच्या मुख्य भूमिकेत आहेत.
हा चित्रपट १ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित झाला आणि अल्पावधीत त्याने जगभरातून १२८.१७ कोटी (US$२८.४५ दशलक्ष) कमावले. ६९ व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये, या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक), सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक) (दोन्ही कौशल साठी) यासह आठ नामांकन मिळाले.
सॅम बहादुर (चित्रपट)
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?