छावा मराठा सम्राट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित २०२५ चा भारतीय हिंदी भाषेतील ऐतिहासिक ऍक्शन चित्रपट आहे. यात संभाजी महाराजांची भूमिका विक्की कौशलने साकारली आहे, रश्मिका मंदन्ना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट शिवाजी सावंत यांच्या छावा या मराठी कादंबरीवर आधारित आहे. याचे दिग्दर्शन लक्ष्मण उटेकर यांनी केले असून दिनेश विजान यांनी मॅडॉक फिल्म्स अंतर्गत निर्मिती केली आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →छावा (चित्रपट)
यामागील विज्ञान आणि इतिहास.