शिवरायांचा छावा हा २०२४ मध्ये प्रदर्शित झालेला मराठी भाषेतील ऐतिहासिक नाट्य चित्रपट आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. तर निर्मिती मल्हार पिक्चर कंपनीची आहे. श्री शिवराज अष्टक या चित्रपट शृंखलेतील हा सहावा चित्रपट आहे. तर, फर्जंद (२०१८), फत्तेशिकस्त (२०१९), पावनखिंड (२०२२), शेर शिवराज (२०२२) आणि सुभेदार (२०२३) हे या शृंखलेतील पूर्वीचे चित्रपट आहेत.
या चित्रपटात भूषण पाटील, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, आयशा मधुकर, समीर धर्माधिकारी आणि राहुल देव यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट शिवाजी महाराजांचे पुत्र आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्याभोवती फिरतो. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १४ कोटी रुपये कमावले आणि २०२४-२५ सालातील पाचवा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला.
शिवरायांचा छावा
यामागील विज्ञान आणि इतिहास.