पावनखिंड (इंग्रजी: Pawankhind ) हा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित, ए.ए. फिल्म्स (A A Films) प्रस्तुत आणि अॅलमंड्स क्रिएशन्स (Almonds Creations) निर्मित मराठी भाषेतील ऐतिहासिक घटनेवर आधारित चित्रपट आहे. मराठा योद्धा बाजी प्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात त्यांच्या पवित्र रक्तानं पावन झालेल्या घोडखिंडीचा इतिहास 'पावनखिंड' सिनेमात दाखवला आहे.
'पावनखिंड' सिनेमाचे लेखक-दिग्दर्शन अभिनेता दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अंकित मोहन, अक्षय वाघमारे, वैभव मांगले, हरीश दुधाडे, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, अजिंक्य ननावरे, सुनील जाधव, माधवी निमकर, प्राजक्ता माळी, रुची सवर्ण, उज्ज्वला जोग, दीप्ती केतकर, सुरभी भावे, क्षिती जोग, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, ऋषी सक्सेना,शिवराज वायचळ, संतोष जुवेकर, राजन भिसे, विक्रम गायकवाड, आदी कलाकारांच्या 'पावनखिंड' चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. १८ फेब्रुवारी २०२२ मध्ये हा चित्रपट संपुर्ण महाराष्ट्रात तसेच भारतात काही ठिकाणी प्रदर्शित करण्यात आला आहे.
पावनखिंड (चित्रपट)
या विषयातील रहस्ये उलगडा.