विक्की कौशल

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

विक्की कौशल

विकी कौशल (१६ मे, १९८८:मुंबई, महाराष्ट्र - ) एक भारतीय बॉलिवूड अभिनेता आहे. तो राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेर पुरस्कार विजेता आहे. विकी २०१९ च्या फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटी १०० च्या यादीमध्ये होता. विकी अ‍ॅक्शन डायरेक्टर शाम कौशलचा मुलगा आहे. त्यांनी राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकी पूर्ण केली.

कौशलने गॅंग्स ऑफ वासेपुर (२०१२) या चित्रपटात अनुराग कश्यपला मदत केली आणि कश्यपच्या दोन चित्रपटांमध्ये किरकोळ भूमिका साकारल्या. मसान (२०१५) या स्वतंत्र चित्रपटात त्याने मुख्य भूमिका केली. यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पणासाठी आयफा आणि स्क्रीन पुरस्कार मिळाला. २०१६ मध्ये तो अनुराग कश्यपच्या मनोवैज्ञानिक थरारपट रमण राघव २.० मध्ये वेटगळ पोलिसाच्या भूमिकेत दिसला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →