आयुष्मान खुराणा (जन्म: निशांत खुराणा; १४ सप्टेंबर, १९८४) हा एक भारतीय अभिनेता, गायक, गीतकार आणि संगीत दिग्दर्शक आहे, जो हिंदी चित्रपटांमध्ये काम करतो. सामाजिक नियमांशी लढा देणाऱ्या सर्वसामान्य पुरुषांच्या चित्रणासाठी तो प्रसिद्ध आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि चार फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार त्याला मिळाले आहेत. २०१३ आणि २०१९ च्या फोर्ब्स इंडियाच्या १०० यादीत त्याला समाविष्ट करण्यात आले. टाइमने २०२० मधील जगातील १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून त्याला घोषित केले.
खुरानाने २००४ मध्ये एमटीव्ही रोडीजच्या वास्तव
प्रदर्शनाचा (रिॲलिटी शो) दुसरा सीझन जिंकला आणि सूत्रसंचालक म्हणून कारकीर्द सुरू केली. २०१२ मध्ये विनोदी प्रणयपट विकी डोनर मधून त्याने पदार्पण केले, ज्यामध्ये शुक्राणू दाता म्हणून केलेल्या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. एका छोट्या धक्क्यानंतर, त्याने व्यावसायिक आणि समीक्षात्मक यशस्वी दम लगा के हैशा (२०१५) मध्ये अभिनय केला.
बरेली की बर्फी (२०१७), शुभ मंगल सावधान (२०१७), बधाई हो (२०१८), ड्रीम गर्ल (२०१९), आणि बाला (२०१९) हे विनोदी नाट्यपट; थरारपट अंधाधुन (२०१८); आणि गुन्हेगारी नाट्यपट कलम १५ (२०१९) यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांतन खुरानाने स्वतःची ओळख निर्माण केली. अंधाधुन मधील आंधळा पियानोवादक आणि आर्टिकल १५ मधील एक प्रामाणिक पोलिस म्हणून केलेल्या कामगिरीमुळे त्याला सलग दोन वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर समीक्षक पुरस्कार मिळाला. अंधाधुनसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही त्याने जिंकला. २०२० मध्ये, त्याने शुभ मंगल ज्यादा सावधान मध्ये भूमिका केली, जो खुलेपणाने समलैंगिक पात्रांनी नेतृत्व केलेला पहिला मुख्य प्रवाहातील बॉलिवूड चित्रपट होता. सकारात्मक पुनरावलोकने मिळूनही बॉक्स ऑफिसवर न चाललेल्या अनेक चित्रपटांनंतर, खुराणाला ड्रीम गर्ल २ (२०२३) मध्ये व्यावसायिक यश मिळाले.
खुराणाने अभिनय भूमिकांव्यतिरिक्त त्याच्या अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. त्याने गायलेले आणि सह-संगीत दिलेले "पाणी दा रंग" या गाण्याने त्याला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला.
आयुष्मान खुराणा
यामागील विज्ञान आणि इतिहास.