अंधाधुन

या विषयातील रहस्ये उलगडा.

अंधाधुन एक २०१८ सालचा विनोदी व रोमांचक चित्रपट आहे. श्रीराम राघवन यांनी दिग्दर्शिन केले असुन वायाकॉम१८ मोशन पिक्चर्सद्वारे याची निर्मिती आहे. या चित्रपटात तब्बू, आयुष्मान खुराणा आणि राधिका आपटे मुख्य भूमिकेत आहेत. एका पियानो वादकाची ही कथा आहे जो एका चित्रपट अभिनेत्याच्या हत्येमध्ये अजाणतेपणाने गुंतला जातो.

चित्रपट ५ ऑक्टोबर २०१८ रोजी चित्रपटगृहात झळकला. समीक्षकांनी चित्रपटचे लिखाण व खुराणा आणि तब्बू यांच्या अभिनयाची प्रशंसा केली. चित्रपटाने चार स्क्रीन पुरस्कार, चार झी सिने पुरस्कार, पाच फिल्मफेअर पुरस्कार व तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवले. हा चित्रपट ₹३२ कोटी च्या बजेटवर तयार झाला होता आणि जगभरातील बॉक्स ऑफिसवर ₹४५६ कोटी पेक्षा जास्त कमाई केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →