मेघना गुलजार एक भारतीय लेखिका, दिग्दर्शिका आणि निर्माती आहे. समीक्षकांच्या प्रशंसा मिळवणारे चित्रपट दिग्दर्शित करण्यासाठी त्या प्रसिद्ध आहे असे; तलवार (२०१५) आणि राझी (२०१८). गुलजार आणि अभिनेत्री राखी यांच्या त्या कन्या आहे व त्या वडिलांसोबत त्यांच्या चित्रपटांसाठी सहाय्यक म्हणून सामील झाल्या. तिच्या वडिलांच्या १९९९ मध्ये दिग्दर्शित हु तू तू या चित्रपटाची पटकथा त्यांनी लिहीली. मेघना नंतर एक स्वतंत्र दिग्दर्शिका बनल्या आणि पहिला चित्रपट, फिल्हाल... २००२ मध्ये प्रदर्शित झाला.
आठ वर्षांच्या विश्रांतीनंतर, त्यांनी तलवार (२०१५) दिग्दर्शित केले, ज्याने त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळवून दिले व बॉक्स ऑफिसवर मध्यम यश मिळाले.
२०१८ मध्ये त्यांनी गुप्तचर रोमांचक चित्रपट राझी दिग्दर्शित केला, जो सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांपैकी एक होता. राझीसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांनी छपाक (२०२०) या चरित्रात्मक चित्रपटाचे दिग्दर्शन केले ज्याला समीक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. पुढे त्यांनी सॅम बहादूर (२०२३) हा आत्मचरित्रात्मक चित्रपट दिग्दर्शित केला जो सॅम माणेकशॉच्या जीवनावर आधारीत होता.
मेघना गुलजार
यामागील विज्ञान आणि इतिहास.