लिओनार्दो दा विंची–फ्युमिचिनो विमानतळ

थोडक्यात पण महत्त्वाचे.

लिओनार्दो दा विंची–फ्युमिचिनो विमानतळ

लियोनार्दो दा विन्ची-फ्युमिचिनो विमानतळ (इटालियन: Fiumicino – Aeroporto Internazionale Leonardo da Vinci) (आहसंवि: FCO, आप्रविको: LIRF) हा इटली देशाच्या रोम शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. रोम शहराच्या ३५ किमी नैऋत्येस स्थित असलेला हा विमानतळ २०११ साली युरोपमधील नवव्या क्रमांकाच्या वर्दळीचा तर जगातील ४६व्या क्रमांकाचा विमानतळ होता. २०२३ साली ४ कोटी प्रवाशांनी येथून ये-जा केली.

प्रसिद्ध मध्य युगीन गणितज्ञ, चित्रकार, शिल्पकार लिओनार्दो दा विंची ह्याचे नाव रोम विमानतळाला दिले गेले आहे. आयटीए एरवेझ ह्या प्रमुख इटालियन कंपनीचा वाहतूकतळ येथेच आहे. याशिवाय निऑस, एरोइटालिया, रायनएर, व्हुएलिंग आणि विझ्झ एर या विमानकंपन्यांची सुद्धे येथे ठाणी आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →