किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ (अरबी: مطار الملك خالد الدولي) (आहसंवि: RUH, आप्रविको: OERK) सौदी अरेबियाच्या रियाध शहराजवळील विमानतळ आहे. १९८३मध्ये सुरू झालेल्या या विमानळावर प्रत्येकी आठ गेट्स असलेली चार टर्मिनल, मशीद तसेच ११,६०० मोटारगाड्यांसाठीचा तळ आहेत. चार टर्मिनलांपैकी फक्त तीन सध्या वापरात आहेत. पैकी एक टर्मिनल सौदी राजघराण्यासाठी राखीव आहे. ३१५ किमी२ (७८,००० एकर) इतका विस्तार असलेला हा विमानतळ जगातील सगळ्यात मोठा विमानतळ आहे.
दोन समांतर धावपट्ट्या असलेला हा विमानतळ नासाच्या स्पेस शटलच्या अवतरणासाठीते एक राखीव स्थळ होती.
एर इंडिया मार्फत किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून भारतामधील दिल्ली, मुंबई, कोळिकोड व तिरुवनंतपुरम ह्या शहरांमध्ये थेट प्रवासी विमानसेवा पुरवली जाते. जेट एरवेझ येथून मुंबई पर्यंत थेट सेवा पुरवत असे.
किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?