झ्युरिक विमानतळ (जर्मन: Flughafen Zürich) (आहसंवि: ZRH, आप्रविको: LSZH) हा स्वित्झर्लंड देशाच्या झ्युरिक शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. झ्युरिक शहराच्या १३ किमी उत्तरेस स्थित असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार स्वित्झर्लंडमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे. स्विस इंटरनॅशनल एरलाइन्स आणि एडेलवाइस एर या देशातील प्रमुख विमान वाहतूक कंपन्यांची ठाणी येथे आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →झ्युरिक विमानतळ
थोडक्यात पण महत्त्वाचे.