व्हँकूव्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ

यामागील विज्ञान आणि इतिहास.

व्हँकूव्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ

व्हँकूव्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: YVR, आप्रविको: CYVR) हा कॅनडा<च्या ब्रिटिश कोलंबियातील व्हँकूवर शहराचा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. रिचमंड या उपनगरात असलेला हा विमानतळ व्हँकुव्हर शहर आणि लोअर मेनलँड प्रदेशाला विमानसेवा पुरवतो. हा विमानतळ शहराच्या मध्यवर्तीभागापासून १२ किमी (७.५ मैल) अंतरावर आहे.

हा विमानतळ कॅनडामधील प्रवासीसंख्येनुसार (२६.२ दशलक्ष) टोराँटो पियर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात व्यस्त विमानतळ आहे. या विमानतळावरून उत्तर अमेरिका किंवा युरोपमधील इतर कोणत्याही विमानतळापेक्षा चीनला अधिक थेट उड्डाणे आहेत. हे व्हँकूवर विमानतळ एर कॅनडा आणि वेस्टजेटचे ठाणे आहे. येथे यूएस बॉर्डर प्री-क्लियरन्स सुविधा आहेत.

हा विमानतळ एकूण सुमारे १,३४० हेक्टर (३,३११ एकर) जागेवर पसरलेला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →