इस्तंबूल सबिहा गोकचेन आंतरराष्ट्रीय विमानतळ (तुर्की: İstanbul Sabiha Gökçen Uluslararası Havalimanı) (आहसंवि: SAW, आप्रविको: LTFJ) हा तुर्कस्तान देशाच्या इस्तंबूल शहरामधील एक प्रमुख विमानतळ आहे.
१९२४ सालापासून वापरात असलेल्या इस्तंबूल अतातुर्क विमानतळ ह्या इस्तंबूलमधील विमानतळावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी २००१ साली सबिहा गोकचेन आंतरराष्ट्रीय विमानतळ उघडण्यात आला. इस्तंबूल शहराच्या ३२ किमी आग्नेयेस आशिया खंडामध्ये स्थित असलेल्या ह्या विमानतळाला तुर्कस्तानचा पहिला राष्ट्राध्यक्ष मुस्तफा कमाल अतातुर्क ह्याची दत्तक घेतलेली मुलगी व जगातील सर्वप्रथम महिला लढवय्या वैमानिक सबिहा गोकचेन हिचे नाव देण्यात आले आहे. तुर्कस्तानची राष्ट्रीय विमान कंपनी तुर्की एरलाइन्सचा वाहतूकतळ येथेच आहे.
इस्तंबूल सबिहा गोकचेन आंतरराष्ट्रीय विमानतळ
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.