इस्तंबूल विमानतळ

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

इस्तंबूल विमानतळ

इस्तंबूल विमानतळ (तुर्की: Atatürk Havalimanı) (आहसंवि: IST, आप्रविको: LTBA) हा तुर्कस्तान देशामधील सर्वात मोठा व इस्तंबूल शहराचा प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ इस्तंबूलच्या पश्चिम भागात स्थित आहे. १९२४ सालापासून वापरात असलेला अताततुर्क विमानतळ २ एप्रिल, २०१९ रोजी फक्त खाजगी विमानांसाठी ठेवून इतर वाहतूक येथे हलविण्यात आली. तुर्कस्तानची राष्ट्रीय विमान कंपनी तुर्की एरलाइन्सचे मुख्यालय व प्रमुख वाहतूकतळ येथेच आहे.

२०१३ साली ५.१ कोटी प्रवाशांची वाहतूक करणारा इस्तंबूल विमानतळ युरोपातील पाचव्या तर जगातील १७व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता. येथून जगातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांना थेट विमानसेवा पुरवली जाते. सध्या तुर्की एरलाइन्स येथून भारतामधील दिल्ली व मुंबई ह्या शहरांना प्रवासीसेवा पुरवते.

अतातुर्क विमानतळावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी २००१ साली इस्तंबूल सबिहा गोकचेन आंतरराष्ट्रीय विमानतळ उघडला गेला. २०१९मध्ये अतातुर्क विमानतळावरील वाहतूक इस्तंबूल विमानतळावर हलविण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →