ओ.आर. टॅम्बो आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: JNB, आप्रविको: FAOR) हा दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग आणि मुख्य राजधानी प्रिटोरिया या तीनपैकी दोन राजधान्यांचा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ केम्प्टन पार्क या उपनगरात आहे. येथून हे दक्षिण आफ्रिकेमधील जवळजवळ सगळ्या शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. तसेच हा विमानतळ जोहान्सबर्ग-प्रिटोरियाचा मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. या विमानतळाची क्षमता वर्षाकाठी २ कोटी ८० लाख प्रवाशांची आहे. ओ.आर. टॅम्बो साउथ आफ्रिकन एअरवेझचे मुख्य ठाणे आहे.
याचे पूर्वीचे नाव यान स्मट्स आंतरराष्ट्रीय विमानतळ असे होते. यान स्मट्स हे दक्षिण आफ्रिकेचे माजी पंतप्रधान होते. १९९४मध्ये आफ्रिकन नॅशनल काँग्रेस (ANC) सरकारने विमानतळांना राजकारण्यांचे नाव न देण्याचे धोरण लागू केले तेव्हा या विमानतळाचे नाव जोहान्सबर्ग आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्यात आले. कालांतराने हे धोरण मागे घेण्यात आल्यावर २७ ऑक्टोबर, २००६ रोजी या विमानतळाला नाव वर्णभेद विरोधी राजकारणी ऑलिव्हर रेजिनाल्ड टॅम्बो (१९१७-१९९३) यांचे नाव देण्यात आले.
१९५२मध्ये हा विमानतळ बांधण्याआधी पाल्मेटफाँटेन विमानतळ जोहान्सबर्गचा मुख्य विमानतळ होता.
ओ.आर. टॅम्बो आंतरराष्ट्रीय विमानतळ एक गरम आणि उंच विमानतळ आहे. याची उंची सरासरी समुद्रसपाटीपासून १,७०० मी( ५,५०० फूट) असल्याने येथील हवेची घनता कमी आहे. यामुळे येथील धावपट्ट्या इतर विमानतळांच्या तुलनेत खूप लांब आहेत
.
ओ.आर. टॅम्बो आंतरराष्ट्रीय विमानतळ
या विषयातील रहस्ये उलगडा.