माल्टा आंतरराष्ट्रीय विमानतळ

यामागील विज्ञान आणि इतिहास.

माल्टा आंतरराष्ट्रीय विमानतळ

माल्टा आंतरराष्ट्रीय विमानतळ ( माल्टिज: L-Ajruport Internazzjonali ta' Malta , (आहसंवि: MLA, आप्रविको: LMML)) हा माल्टामधील एकमेव विमानतळ आहे. विमानतळ संपूर्ण देशाला विमानसेवा पुरवतो.

हा विमानतळ माल्टा बेटावर राजधानी, व्हॅलेट्टाच्या नैऋत्येस, लुका शहरात आहे. येथे पूर्वी आरएएफ लुका हा वायुसेना स्थान व्यापलेले आहे. हा विमानतळ केएम माल्टा एरलाइन्स आणि मेडाव्हिया (तथा मेल एर) चे मुख्य ठाणे आहे. या शिवाय रायनएर उपकंपनी माल्टा एरचे ठाणे आहे.



माल्टा विमानतळावर एकच प्रवासी टर्मिनल आहे. हे २५ मार्च १९९२ रोजी पूर्णपणे कार्यान्वित झाले. या. विमानतळावर ला व्हॅलेट क्लब नावाचे व्हीआयपी विश्रामगृह आहे. विमानतळावर लुफ्तांसा टेक्निक आणि एसआर टेक्निक्स द्वारे अनेक देखभाल सुविधा चालविल्या जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →